पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धक्कादायक, ड्रोनच्या साह्याने पाकने पंजाबमध्ये पाठवला शस्त्रसाठा

या प्रकरणी एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

पाकिस्तानस्थित खलिस्तान दहशतवादी गटाकडून आठ ड्रोनच्या साह्याने सुमारे ८० किलो वजनाचा शस्त्रसाठा पाकिस्तानातून पंजाबमध्ये पाठविण्यात आल्याची माहिती सुरक्षा दलातील सूत्रांनी दिली आहे. शस्त्रसाठ्यामध्ये शस्त्रे आणि दारूगोळा दोन्हींचा समावेश आहे. ९ ते १६ सप्टेंबर या कालावधीमध्ये हा शस्त्रसाठा भारतात पाठविण्यात आला. 

राज्यात पावसाची दमदार हजेरी, विटा-कराड मार्ग बंद

खलिस्तान झिंदाबाद फोर्सच्या मालकीचा हा शस्त्रसाठा होता आणि तो भारतात पाठविण्यासाठी पाकिस्तानातील गुप्तचर यंत्रणा आयएसआयने मदत केली होती, अशीही माहिती समजली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठीच हे सर्व करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानातून ड्रोनच्या साह्याने पाठविण्यात आलेला शस्त्रसाठा पंजाबमध्ये अमृतसर आणि तरण तारण या जिल्ह्यांमध्ये उतरविण्यात आला होता. २२ सप्टेंबर रोजी तरण तारण जिल्ह्यामध्ये पोलिसांनी दारुगोळा जप्त केल्यानंतर या प्रकाराचा उलगडा झाला.

या प्रकरणी पंजाब पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. यामध्ये शुभदीप नावाच्या २२ वर्षांच्या तरुणाचा समावेश आहे. तपासकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तो मूळचा अमृतसर जिल्ह्यातील आहे. या प्रकरणातील मूळ आरोपी मान सिंग आणि अन्य आरोपी आकाशदीप यांनी शुभदीपचे मन परिवर्तन करून त्याला या कामात गोवले. 

राष्ट्रवादीचा आज बारामती बंद, पुण्यासह राज्यात विविध ठिकाणी निदर्शने

या घटनेचा तपास करण्यासाठी वेगवेगळ्या तपाससंस्था कार्यरत आहेत. यामध्ये पंजाब पोलिस, केंद्रीय सुरक्षा संस्था, सीमा सुरक्षा दल, भारतीय हवाई दल यांचा वापर केला जातो आहे. प्राथमिक तपासणीमध्ये चीनमध्ये तयार करण्यात आलेले आणि १० किलोपर्यंतचे वजन उचलू शकणारे ड्रोन या कामासाठी वापरण्यात आले होते. पाकिस्तानच्या बाजूला नियंत्रण रेषेपासून २ किलोमीटर आतून हे ड्रोन सोडण्यात आले होते आणि ते दोन हजार फूट उंचीवरून पाच किलोमीटरचे अंतर कापून भारतात पाठविण्यात आले होते. पंजाबमधील फिरोजपूरमध्येही काही ड्रोन दिसले होते. त्यानंतर भारतीय हवाई दल आणि सीमा सुरक्षा दलाला दिसताक्षणी हे ड्रोन पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.