पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाः पाकिस्तानची भारताला साथ, व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये होणार सहभागी

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर

जगभरात वेगाने पसरत असलेल्या कोरोना विषाणूशी निपटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्क देशाच्या सदस्यांना व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. सार्क देशांच्या बहुतांश सदस्यांनी मोदींच्य आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. परंतु, पाकिस्तानने यावर काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यामुळे जगभरातील माध्यमांनी त्यांच्यावर तोंडसुख घेतले होते. अखेर पाकिस्तानने पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला पाठिंबा दिला असून या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभागी होणार असल्याचे म्हटले आहे. या विषाणूमुळे जगभरातून ५००० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. 

अलिबागमधील मांडव्याजवळ बोट बुडाली, ८८ प्रवाशी सुखरुप

या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी सामूहिकरित्या प्रयत्न करण्याबाबत चर्चा करण्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले होते. 

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या आयशा सिद्दीकी यांनी शुक्रवारी एक टि्वट केले. त्या म्हणाल्या की, पाकिस्तानी पंतप्रधानांचे विशेष सहायक जफर मिर्झा या मुद्द्यावर सार्क देशांच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभागी होतील. या विषाणूविरोधातील अभियानाचे पाकिस्तानच्या नेतृत्व मिर्झा हे करत आहेत. 

कोरोना विषाणूमुळे बेंगळुरुतील इन्फोसिसची इमारत केली रिकामी

सलग टि्वट करुन पंतप्रधान मोदींनी म्हटले होते की, आपली पृथ्वी कोविड-१९ नोवल कोरोना विषाणूविरोधात लढत आहे. विविध स्तरांवर, सरकार आणि लोकांचा सामना करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. दक्षिण आशिया जेथे जगातील सर्वाधिक लोकसंख्या राहते. आपल्या लोकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यात कोणतीही कसर सोडली जाणार नाही. 

मेयो रुग्णालयातून पळून गेलेले कोरोनाचे संशयित रुग्ण सापडले

त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले की, मी सुचवू शकतो की, सार्क देशांना कोरोना विषाणूशी लढण्यासाठी एक मजबूत रणनीती आखण्याची गरज आहे. आपण सर्वजण व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपल्या नागरिकांना स्वस्थ ठेवण्यासाठीच्या पद्धतीवर चर्चा करु शकतो. एकत्र येऊन आपण जगासमोर एक उदाहरण सादर करु शकतो आणि पृथ्वीचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी योगदान देऊ शकतो.

मोदींचा हा प्रस्ताव बहुतांश सार्क देशांनी मान्य केला. पाकिस्तानची प्रतिक्रिया रात्री उशिरा आली.