पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इम्रान खान यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण

इम्रान खान

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर कोरोना विषाणूची तपासणी करण्याची वेळ आली आहे.  सामाजिक कार्यकर्ता आणि ईधी फाउंडेशनचे प्रमुख प्रमुख फैजल ईधी यांनी नुकतीच इम्रान खान यांची भेट घेतली होती. त्यानंतर फैजल ईधी यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. त्यांना इस्लामाबाद येथील रुग्णालया दाखल करण्यात आले असून त्यांच्या संपर्कात आल्यामुळे इम्रान खान यांना कोरोनाची तपासणी करावी लागणार आहे.  

पुढील सूचना येईपर्यंत रॅपीड टेस्ट करु नका, ICMR कडून राज्यांना आदेश

कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मदतीसाठी फैजल ईधी यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेऊन त्यांच्याकडे धनादेश सूपूर्द केला होता. ईधी यांनी कोरोनाच्या लढ्यासाठी एक कोटींची मदत केली होती. पण त्यांना कोरोनाची लागण झाल्याने इम्रान खान यांना क्वॉरंटाईन व्हावे लागणार आहे. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत ८ हजार ४१८ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील १७६ लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे.  याठिकाणी १ हजार ९७० लोक कोरोनातून बरे झाले आहेत. पंजाब प्रांतमध्ये सोमवारपर्यंत ३,८२२ पेक्षा अधिक रुग्ण आढळले होते.

देशातील गरीब कधी जागे होणार म्हणत राहुल गांधींची पुन्हा सरकारवर टीका

चीनच्या वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. कोरोनावर कोणतीही लस उपलब्ध नसल्यामुळे अनेक देशांवर लॉकडाउनची नामुष्की ओढावली आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करुन कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाशिवाय कोणताही पर्याय सध्याच्या घडीला यावर दिसत नाही. कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे आता इम्रान खान यांना क्वॉरंटाइन व्हावे लागणार आहे.