कलम ३७० हटवण्याच्या भारत सरकारच्या निर्ण्यामुळे जळफळाट झालेल्या पाकिस्तानकडून सातत्याने चिथावणीखोर कृत्ये केली जात आहेत. आता लडाख सीमेवर पाकने युद्ध सामुग्री जमा करण्यास सुरुवात केली आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रशासित प्रदेश लडाखच्या सीमेवर पाकिस्तान स्थित स्कर्दू परिसरात शनिवारी पाकिस्तानने हवाईदलाच्या तीन सी १३० ट्रान्सपोर्ट एअरक्राप्टने युद्ध सामुग्री आणली असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
जम्मू काश्मीर, लडाखमधील विकासासाठी रिलायन्स पुढाकार घेणार
सूत्रांनी म्हटले की, सीमेजवळ आघाडीच्या सैन्य चौक्यांवर साहित्य जमा केले जात आहेत. स्कर्दू हवाई तळावर त्यांनी जेएफ १७ फायटर विमाने तैनात केल्याची शक्यता आहे.
भारतातील गुप्तचर संस्था, हवाई दल आणि लष्कराकडून पाकिस्तान हवाई दलाच्या हालचालींवर नजर ठेवण्यात आली आहे. त्यांनी पाकिस्तानी क्षेत्रात होत असलेल्या हालचालीवर देखरेख ठेवली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी हवाई दल, लष्कराबरोबर सराव करण्याची योजना आखत आहे. ताज्या वृत्तानुसार या हालचाली त्याचाच भाग असू शकतात. स्कर्दू पाकिस्तान हवाई दलाचे सैन्य अभियानातील अग्रिम चौकी आहे. त्याचा वापर भारताबरोबर असलेल्या सीमेवर लष्कराच्या अभियानाला मदतीसाठी केला जातो.