पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Masood Azhar Terrorist : मोदींना निवडणुकीत फायदा होऊ नये म्हणून पाकिस्तानकडून राजकारण

मसूद अजहर

जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आल्यानंतर आता या घटनेच्या मागील अनेक गोष्टी पुढे येऊ लागल्या आहेत. मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याला आपण फार काळ विरोध करू शकत नाही, हे चीनच्या लक्षात आले होते. पण संयुक्त राष्ट्रसंघाने हा निर्णय लोकसभा निवडणुकीनंतर जाहीर करावा, यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील होता. लोकसभा निवडणुकीच्या मध्यावर हा निर्णय जाहीर झाल्यास त्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फायदा होईल, असे वाटल्यानेच निर्णय लांबविण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील होता, असे या घटनेशी संबंधित सूत्राने 'हिंदूस्थान टाइम्स'ला सांगितले.

चीन-पाकला दणका, मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित

भारतात लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू असतानाच मसूद अजहरवर आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून शिक्का मारला जाऊ नये, असे पाकिस्तानला वाटत होते. तसे झाल्यास त्याचा नरेंद्र मोदी यांना फायदा होईल, असे पाकिस्तानला वाटत होते. त्यामुळे हा निर्णय लांबणीवर टाकण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील होता.

सूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यामागील चीनचा विरोध अजून काही दिवस कायम राहावा, यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील होता. १५ मे च्या सुमारास चीनने आपला विरोध मागे घ्यावा, यासाठी पाकिस्तान प्रयत्न करीत होता. जेणेकरून लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना याचा फायदा झाला नसता, अशी पाकिस्तानची रणनिती होती, असे सूत्रांनी सांगितले.

ही तर फक्त सुरुवात, मसूद प्रकरणावर मोदींची पहिली प्रतिक्रिया

मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने महत्त्वाची भूमिका बजावली. चीनने आपला विरोध मागे घ्यावा, यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने जोरदार प्रयत्न केले. त्यामुळे अखेर १ मे रोजी मसूज अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आला.