पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमार बाजवा यांना ३ वर्षे मुदतवाढ

जनरल कमार बाजवा

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तेथील लष्कर प्रमुख जनरल कमार जावेद बाजवा यांना तीन वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० भारताने रद्द केले आहे. त्याचबरोबर या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा मुद्दा पाकिस्तानला जिव्हारी लागला आहे. तेव्हापासून पाकिस्तानने तणतण करण्यास सुरुवात केली असून, वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर हा मुद्दा उपस्थित केला जातो आहे. त्या पार्श्वभूमीवर बाजवा यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय इम्रान खान यांनी घेतला आहे.

'आरोपांमध्ये तथ्य नसल्यास राज ठाकरेंना सोडलं जाईल'

जनरल कमार जावेद बाजवा यांचा लष्कर प्रमुखपदाचा कार्यकाळ येत्या नोव्हेंबरमध्ये संपुष्टात येणार होता. इम्रान खान यांनी या संदर्भात जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जनरल कमार जावेद बाजवा यांची लष्कराच्या प्रमुखपदी आणखी तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर नवा कार्यकाळ सुरू होईल. प्रादेशिक सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. 

हवाई वाहतूक घोटाळ्याप्रकरणी आता पी चिदंबरम यांना ईडीची नोटीस

माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी २०१६ मध्ये कमार जावेद बाजवा यांची लष्कर प्रमुखपदी तीन वर्षांसाठी नियुक्ती केली होती. गेल्या तीन वर्षांतील त्यांच्या अनुभवामुळेच इम्रान खान यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावरच विश्वास टाकत त्यांना तीन वर्षांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.