पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनामुळे ३ एप्रिलला होणारा पद्म पुरस्कार सोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय

पद्म पुरस्कार सोहळा

कोरोना विषाणुमुळे ३ एप्रिलला राष्ट्रपती भवनात होणारा पद्म पुरस्कार सोहळा रद्द करण्यात आला आहे. लवकरच नवी तारीख जाहीर केली जाणार आहे.  जानेवारी महिन्यात पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती.  देशात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रार्दुभावमुळे पद्म पुरस्कार वितरण सोहळा रद्द करण्यात आला आहे. 

Coronavirus: मनसेचा गुढीपाडवा मेळावा रद्द

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला एकूण ११२ जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले होते. ९४ जणांना पद्मश्री, १४ जणांना पद्मभूषण आणि चार जणांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाले. हा वितरण सोहळा पुढील महिन्यात  होता. मात्र कोरोनामुळे मोठ मोठे कार्यक्रम, सभारंभ रद्द  करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून एकाच ठिकाणी गर्दी न करण्याची सूचना करण्यात आली आहे. 

पुणेःकोरोनाग्रस्त १० रुग्णांची प्रकृती स्थिर,२३ जणांचे अहवाल निगेटिव्ह

देशात कोरोनाचे ८० हून अधिक रुग्ण आढळले आहे तर राज्यात कोरोनाचे १९ रुग्ण उपचार घेत आहेत.