पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला, सुप्रीम कोर्टातही तातडीने दिलासा नाही

पी चिदंबरम

आयएनएक्स मीडिया प्रकरणात माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. यामुळे चिदंबरम यांना धक्का बसल्याचे मानले जात आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग आणि सक्तवसुली संचालनालयाकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानेही लगेचच चिदंबरम यांना दिलासा देण्यास नकार दिला. सर्वोच्च न्यायालयात बुधवारी या प्रकरणी सुनावणी होईल.

ईडी कार्यालयाबाहेर येऊ नये; राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांनी आवाहन

आयएनएक्स मीडिया प्रकरणात पी. चिदंबरम यांच्याकडून सादर करण्यात आलेले दोन्ही अर्ज नाकारण्यात येत आहेत, असे न्या. सुनील गौर यांनी स्पष्ट केले. २५ जानेवारी रोजी न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. तात्काळ अटक करण्यात येऊ नये, म्हणून तीन दिवसांचे अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी चिदंबरम यांच्याकडून करण्यात आली होती. ती सुद्धा न्यायालयाने फेटाळली.

परदेशी गुंतवणूक प्रोत्साहन महामंडळाने चिदंबरम अर्थमंत्री असताना आयएनएक्स मीडिया कंपनीला परदेशातून निधी जमविण्यास मंजुरी दिली होती. यामध्ये गैरप्रकार झाल्याचा ठपका ठेवून सीबीआयने  १५ मे २०१७ रोजी चिदंबरम यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांमधील गैरप्रकारांवरून सक्तवसुली संचालनालयानेही गुन्हा दाखल केला. आयएनएक्स मीडियाने सुमारे ३०७ कोटी रुपयांचा निधी त्यावेळी जमविला होता.

झुंडबळीमुळे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग चिंतेत; व्यक्त केले हे मत

इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी हे दोघेही आयएनएक्स मीडियाचे सहसंस्थापक आहेत. त्यांनी पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती याच्या सोबतीने हा सर्व कट रचल्याचे सीबीआयने म्हटले आहे. हे सर्व घडले त्यावेळी चिदंबरम केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री होते.