पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पी.चिदंबरम यांची तिहार तुरुंगातून सुटका

तिहारच्या तुरुंगाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. (Sanchit Khanna)

आयएनएक्स मीडिया प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी चिदंबरम यांची तिहार तुरुंगातून सुटका झाली आहे. त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. चिदंबरम शंभरहून अधिक दिवस तिहार तुरुंगात होते.  

पी. चिदंबरम यांना जामीन मंजूर झाल्यानंतर राहुल गांधी म्हणाले,...

माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम तिहार तुरुंगातून बाहेर पडतानाचे छायाचित्र ((Photos by Amal KS)

चिदंबरम यांचे पुत्र कार्ति चिदंबरम देखील आपल्या वडिलांच्या स्वागतासाठी तुरुंगाच्या बाहेर उपस्थित होते. १०५ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर वडिलांची सुटका झाली असून ते घरी येत असल्याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया कार्ति चिदंबरम यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याबद्दल त्यांनी न्यायालयाचे आभारही मानले. कठिण परिस्थितीत आमच्या कुटुंबियांसोबत असणाऱ्या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचेही त्यांनी आभार मानले. 

कार्ति चिदंबरम वडिलांच्या स्वागतासाठी तुरुंगाबाहेर उपस्थिती होते. (photos by Amal KS)

डेटाच्या नियमनासाठी महत्त्वपूर्ण विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी

आयएनएक्स मीडिया प्रकरणात सुरुवातीला सीबीआयने चिदंबरम यांना अटक केली होती. त्या प्रकरणात त्यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. पण ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांना जामीन मंजूर करण्यात आला नव्हता. काही दिवसांपूर्वीच दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला होता. त्यानंतर त्यांचे वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती. २१ ऑगस्टपासून चिदंबरम अटकेत होते. त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली होती.

पी. चिदंबरम यांच्या स्वागतासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.