पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पीटर, इंद्राणी मुखर्जीला कधीच भेटलो नाही : कार्ती चिदंबरम

इंद्राणी मुखर्जी आणि क्रांति चिदंबरम

आयएनएक्स मीडिया प्रकरणात (INX Media Case) माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या अटकेवर त्यांचा मुलगा आणि काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वडिलांवरील कारवाईने काँग्रेसवर लक्ष केले जात आहे, असा आरोपही शिवगंगा मतदार संघातील खासदार कार्ती यांनी  केला आहे. पी. चिदंबरम यांच्या अटकेवर  एम.के. स्टॅलिन यांच्यासह डीएमके नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. 

पी. चिदंबरम यांच्या अटकेसंदर्भात कार्ती चिदंबरम यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांसमोर प्रकरणातील काही गोष्टींवर भाष्य केले. आयएनएक्स मीडियाची मालकी असलेल्या पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांना कधीही भेटलेलो नाही, असे त्यांनी म्हटले आहे.सीबीआय चौकशी दरम्यानच इंद्राणी मुखर्जी यांना पहिल्यांदा पाहिले होते. याशिवाय त्यांच्या कंपनीसंलग्नित कोणत्याही इतर व्यक्तिसोबत कधी चर्चा देखील केलेली नाही, असेही त्यांनी स्पष्टीकरण दिले.    

दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या झाली: रणदीप सुरजेवाला

माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना सीबीआयने ताब्यात घेतल्यानंतर आपल्या निवासस्थानाबाहेरच किर्ती चिदंबरम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, हे प्रकरण २००८ च्या घटनाक्रमासंबंधीत असून सीबीआयची कारवाई ही राजकीय हेतूने करण्यात आली आहे. या कारवाईतून काँग्रेसला लक्ष करण्यात येत आहे, असा आरोपही त्यांनी केला.   

कलम ३७० वरुन लक्ष विचलित करण्यासाठी अटक: कार्ती चिदंबरम

उल्लेखनिय आहे की, आयएनएक्स मीडिया प्रकरणात बुधवारी रात्री उशीराने सीबीआयने पी. चिदंबरम यांना ताब्यात घेतले होते. काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी देखील सीबीआयच्या कारवाईवर आक्षेप नोंदवला आहे. स्वत:च्या मुलीच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या (इंद्राणी मुखर्जी) माहितीच्या आधारावर एका दिग्गज आणि अनुभवी राजकीय नेत्यावर कारवाई करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी काँग्रेसकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.