पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एअरसेल प्रकरणात चिदंबरम आणि त्यांच्या मुलाला दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर

पी चिदंबरम

आयएनएक्स मीडिया प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर आता माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी चिदंबरम यांना दुसऱ्या एअरसेल मॅक्सिस प्रकरणात विशेष न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती यालाही या प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. जर या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभाग किंवा सक्तवसुली संचालनालयाने पी चिदंबरम यांना अटक केली तर त्यांची एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका केली जावी, असे विशेष न्या. ओपी सैनी यांनी स्पष्ट केले. आयएनएक्स मीडिया प्रकरणात चिदंबरम सध्या सीबीआय कोठडीत आहेत.

पेट्रोल-डिझेलवरील गाड्यांवर बंदीचा विचार नाही - गडकरी

आपल्या निकालपत्रामध्ये न्यायाधीशांनी म्हटले आहे की, एअरसेल मॅक्सिस प्रकरणाच्या तपासामध्ये कोणत्याही कारणाशिवाय दिरंगाई करण्यात आली आहे. या प्रकरणात चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती आता पुराव्यांमध्ये फेरफार करण्याची, ते नष्ट करण्याची, साक्षीदारांना धमकावण्याची शक्यता वाटत नाही. त्यामुळे त्यांना जामीन द्यायला हरकत नाही. 

एअरसेल मॅक्सिस प्रकरणात चिदंबरम आणि त्यांचा कार्ती यांना जामीन मंजूर करू नये. न्यायालयाने आपला निकाल लांबणीवर टाकावा, अशी मागणी सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाकडून न्यायालयात करण्यात आली होती. 

... म्हणून प्रवाशांसह इंडिगोचे विमान सात तास धावपट्टीवर अडकले

आयएनएक्स मीडिया प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पी. चिंदबरम यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास गुरुवारी सकाळी नकार दिला. हे वेगळ्या स्वरुपाचे प्रकरण आहे. त्यामुळे न्यायालय आता अटकपूर्व जामीन देऊ शकत नाही. चिदंबरम यांनी सुनावणी सुरू असलेल्या न्यायालयाकडे अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले.