पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अडाणी डॉक्टरच्या हातात अर्थव्यवस्था, चिदंबरम यांची टीका

पी चिदंबरम

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर अर्थव्यवस्थेच्या खराब व्यवस्थापनाचा आरोप करत तिखट शब्दांत टीका केली आहे. ते म्हणाले की, अर्थव्यवस्था ढासळण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे आणि त्याची देखभाल करण्याची जबाबदारी अडाणी डॉक्टरच्या हातात आहे. वाढती बेरोजगारी आणि घटत्या उपभोगामुळे आज देश गरीब होत आहे. 

चीनकडून मोदींची प्रशंसा, 'कोरोनो'शी लढण्यासाठी दाखवली मदतीची तयारी

अर्थव्यवस्था घटणारी मागणी आणि वाढती बेरोजगारीचा सामना करत आहे. सध्या देशात भीती आणि अनिश्चिततेचे वातावरण आहे. चार वर्षे भाजप सरकारमध्ये मुख्य आर्थिक सल्लागार राहिलेले अरविंद सुब्रमण्यम यांनी तर अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये पोहोचल्याचे म्हटले आहे. पण मी सांगू इच्छितो की रुग्णाला आयसीयूच्या बाहेर ठेवले आहे. अडाणी डॉक्टर त्याच्यावर इलाज करत आहे आणि आजूबाजूला उभे असलेले लोक 'सबका साथ, सबका विश्वास'च्या घोषणा देत आहेत. हे खूप घातक आहे, असे चिदंबरम यांनी म्हटले.

चार महिन्यांचे बाळ आंदोलनात सहभागी झाले होते का? : SC

मोदी सरकारने ज्या अनुभवी सक्षम डॉक्टरांची निवड केली. ते सर्वजण देश सोडून गेले. अशा लोकांच्या यादीत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन, माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम आणि निती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांच्या नावाच समावेश आहे. 

बहिणीबरोबर टिकटॉक व्हिडिओ केला म्हणून निर्वस्त्र करुन मारहाण

तुमचा डॉक्टर किंवा चिकित्सक कोण आहे. हे मला जाणून घ्यायचे आहे. सरकार काँग्रेसला तर अस्पृश्य समजते. दुसऱ्या विरोधी पक्षांबाबत तर त्यांचे मत चांगले नाही. अशावेळी ते कोणाशी सल्लामसलत करत नाहीत.