पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INX मीडिया प्रकरणात चिदंबरम यांना पुन्हा न्यायालयीन कोठडी

पी. चिदंबरम

आयएनएक्स मीडिया प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांना बुधवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यामुळे पुन्हा एकदा चिदंबरम यांची रवानगी तिहार तुरुंगात होणार आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये न्यायालयाने आधीच चिदंबरम यांना जामीन मंजूर केला आहे.

पाकिस्तानच्या गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू तर १३ जखमी

गेल्या आठवड्यात सक्तवसुली संचालनालयाने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये चिदंबरम यांना ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. ३० ऑक्टोबरपर्यंत या कोठडीची मुदत होती. ती आज संपल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात युक्तिवाद करताना ईडीच्या वकिलांनी आणखी एक दिवस कोठडी देण्याची मागणी केली. पण न्यायालयाने ती फेटाळली आणि चिदंबरम यांची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले.

ही तर मोदी सरकारची घोडचूक, काँग्रेसचा केंद्राच्या निर्णयावर हल्ला

तब्येतीच्या कारणावरून आपल्याला अंतरिम जामीन मिळावा, अशी याचिका चिदंबरम यांच्याकडून आधीच दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणाचा तपास सध्या ईडी आणि सीबीआय या दोन्ही केंद्रीय संस्थांकडून केला जातो आहे.