पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एनआरसीतून बाहेर गेलेल्या लोकांबाबत सरकारचे नियोजन काय?- चिदंबरम

पी. चिदंबरम

राष्ट्रीय नागरिक नोंदणीमध्ये (एनआरसी) ज्या १९ लाख लोकांचे नाव नाही, त्यांच्याबाबत सरकारने आपल्या योजनेचा खुलासा केला पाहिजे, अशी मागणी  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी केली आहे. 

स्वीस बँकेत भारतीयांचे किती पैसे? सप्टेंबर २०२०ला समजणार

भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तिहार कारागृहात कैदेत असलेले चिदंबरम यांच्यावतीने त्यांच्या कुटुंबाकडून टि्वट केले जाते. सोमवारी त्यांनी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीबाबत आपले मत मांडले. एनआरसी प्रक्रियेचा परिणाम तुमच्यावर होणार नाही, असा दिलासा भारताने जर बांगलादेशला दिला असेल तर सरकारने त्या १९ लाख लोकांबाबत काय करणार आहे, स्पष्ट करावे असे म्हटले आहे.

हे गंभीर प्रकरण आहे आणि सरकारने स्पष्ट केले पाहिजे की, नागरिकत्वाचे पुरावे सादर करु न शकल्यामुळे एनआरसीच्या बाहेर झालेले १९ लाख लोक कधीपर्यंत अनिश्चित्तेत आणि चिंतेत जगतील. त्यांना नागरिकत्वाच्या अधिकारांपासून कधीपर्यंत वंचित ठेवले जाईल.

'जैश'च्या दहशतवाद्याला अटक; मोठा शस्त्रसाठा जप्त

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला एनआरसीचा बांगलादेशवर काहीच परिणाम होणार नाही, असे आश्वासन दिले असून त्यामुळे मी खूप समाधानी असल्याचे गेल्या आठवड्यात चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी म्हटले होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:P Chidambaram says If NRC is a legal process how will the legal process deal with the 19 lakh persons who have been declared non citizens