पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशाच्या अर्थव्यवस्थेला आता देवच वाचवेल, चिदंबरम यांची टीका

पी. चिदंबरम

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी जीडीपीवर केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी मंगळवारी भाजपवर निशाणा साधला. आता देशाच्या अर्थव्यवस्थेला देवच वाचवू शकतो, असा टोला त्यांनी लगावला आहे.

जीडीपी म्हणजे रामायण, बायबल नाहीः भाजप खासदार

त्यांनी टि्वटमध्ये म्हटले की, जीडीपीच्या आकड्यांना काही अर्थ राहिलेला नाही. वैयक्तिक करात कपात होईल, आयात शूल्कात वाढ केली जाईल. सुधारणेबाबत भाजपचे हे विचार आहेत. भारताच्या अर्थव्यवस्थेला देवच वाचवेल. 

दरम्यान, कॉर्पोरेट करातील कपातीशी संबंधित संशोधन विधेयकावर चर्चेदरम्यान दुबे यांनी सोमवारी लोकसभेत जीडीपाली रामायण, महाभारत मानने योग्य नसल्याचे म्हटले आणि भारतासाठी जीडीपी काही कामाचे नसल्याचेही त्यांनी म्हटले होते. 

दोन पत्नींसह नवऱ्याने आठव्या मजल्यावरून उडी मारली

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी सोमवारी लोकसभेत बोलताना जीडीपीला बायबल, रामायण आणि महाभारत मानण्याची गरज नसल्याचे म्हटले. वर्ष १९३४ मध्ये जीडीपी लागू झाली. त्यापूर्वी जीडीपी नव्हते. फक्त जीडीपीलाचा बायबल, रामायण आणि महाभारत मानणे सत्य नाही. भविष्यातही जीडीपीचा जास्त काही उपयोग होणार नाही. सामान्य व्यक्तीचा आर्थिक विकास होत आहे किंवा नाही हाच आजचा नवा सिद्धांत आहे. विकासात सातत्य आहे की नाही, हेच जीडीपीपेक्षा महत्त्वाचे आहे, असे दुबे यांनी म्हटले होते.

संगमनेरमध्ये ट्रक चालकाकडून टोल कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला