पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चिदंबरम यांच्या याचिकेवर SC म्हणाले, तत्काळ सुनावणी अशक्य!

पी. चिदंबरम

आयएनएक्स मीडिया प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर गायब असेलेले माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांची तत्काळ सुनावणी करण्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायाधीश एनव्ही रमण्णा खंडपीठाने हे प्रकरण सूचीबद्ध झाल्याशिवाय याबाबत कोणतीही सुनावणी होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. ही प्रक्रिया उद्यापर्यंत (गुरुवारी) पूर्ण होईल, त्यानंतर प्रकरणावर सुनावणी केली जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे चिदंबरम यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

चिदंबरम यांना दुसरा धक्का, ईडीकडून लुकआऊट नोटीस जारी

प्रकरण सूचीबद्ध करण्याबाबतचा निर्णय मुख्य न्यायाधीश रंजन गोगाई करणार आहेत. यापूर्वी न्यायालयाने चिदंबरम यांची याचिका अपूर्ण असल्याचे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाचे निबंधक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उणिवा दूर करुन हे प्रकरण सूचीबद्ध यादीत घेतले जाणार आहे. तत्पूर्वी आयएनएक्स मीडिया प्रकरणात त्यांच्या मालकी हक्काबाबत करण्यात आलेली टिपण्णी पूर्णत: निराधार आहे, अशी याचिका चिदंबरम यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. 

सुप्रीम कोर्टाकडूनही चिदंबरम यांना दिलासा नाही,प्रकरण सरन्यायाधीशांकडे

चिदंबरम यांना एकापाठोपाठ एक धक्के बसताना दिसत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या अटकेस स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर लगेचच सक्त वसुली संचालनालयानेही (ईडी) त्यांच्याविरोधात 'लुकआऊट नोटीस' जारी केली होती. दरम्यान, उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मंगळवारी सायंकाळी सीबीआयची टीम त्यांच्या घरी दाखल झाली होती. मात्र पी. चिदंबरम घरी उपस्थित नसल्यामुळे सीबीआयची टीम निघून गेली.