पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INX मीडिया प्रकरणः चिदंबरम यांच्या अर्जावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

पी. चिदंबरम

आयएनएक्स मीडिया प्रकरणात अंतरिम जामीन देण्यास नाकारणाऱ्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांच्या अर्जावर आज (सोमवार) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 

न्या. आर भानुमती यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर चिदंबरम यांच्या नव्या अर्जावर सुनावणी होईल. चिदंबरम यांनी आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणात त्यांच्याविरोधात जारी करण्यात आलेले अटक वॉरंट आणि सोमवारपर्यंत सीबीआय कोठडीत पाठवण्याच्या खालच्या न्यायालयाच्या आदेशास आव्हान दिले आहे. 

पीटर, इंद्राणी मुखर्जीला कधीच भेटलो नाही : कार्ती चिदंबरम

मागील आठवड्यात शुक्रवारी (दि.२३ ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या अर्जाप्रकरणी चिदंबरम यांना सोमवारपर्यंत अटकेपासून सूट दिली होती. सर्वोच्च न्यायालयाने चिदंबरम यांच्या अर्जावर ईडीकडून उत्तरही मागितले होते. तसेच सर्व तिन्ही प्रकरणे सोमवारी त्यांच्यासमोर सूचीबद्ध करण्याचे निर्देश दिले होते.

संविधानाच्या कलम २१ अंतर्गत येणाऱ्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन असल्याचे चिदंबरम यांनी म्हटले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने २० आणि २१ ऑगस्टला सुनावणी केली नाही. त्यामुळे त्यांना २१ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली.

दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या झाली: रणदीप सुरजेवाला

ईडीकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले होते की, याचिकाकर्ता आणि त्यांच्या पक्षाच्या सहकाऱ्यांनी मोठा गोंधळ घातला आणि राजकीय सूडापोटी ही कारवाई केल्याचा आरोप केला. पण मी जबाबदारीने सांगतो की, धनशोधनाचे हे प्रकरण खूप मोठे आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:P Chidambaram Plea Supreme Court Hearing Today Against High Court Order in INX Media Case