पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पी. चिदंबरम यांना आज सीबीआय कोर्टात केले जाणार हजर

पी. चिदंबरम यांना अटक

आयएनएक्स मीडिया प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सीबीआयने अटक केली. बुधवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास पी. चिदंबरम यांना दिल्लीतील जोरा बाग निवासस्थानावरुन सीबीआयने अटक केली. बुधवारी त्यांच्याविरोधात ईडीने 'लुकआऊट नोटीस' जारी केली होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान, आज पी. चिदंबरम यांना सीबीआयच्या कोर्टात हजर केले जाणार आहे. 

चिदंबरम यांच्या निवासस्थानाबाहेर मोदींविरोधात घोषणा

दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी पी. चिदंबरम यांना अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने देखील तातडीने0 सुनावणीला नकार दिला. तेव्हापासून चिदंबरम हे बेपत्ता झाले होते. त्यांना अटक करण्यासाठी सीबीआय आणि ईडीची टीम त्यांच्या निवास्थानी सतत जात होती. बुधवारी ईडीने त्यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली. त्यानंतर रात्री ८ वाजता चिदंबरम हे काँग्रेस कार्यालयामध्ये दाखल झाले. त्याठिकाणी त्यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. अखेर रात्री सव्वा दहाच्या सुमार सीबीआयने त्यांना अटक केली. 

प्रवीण सारखं टोकाचं पाऊल उचलू नका, राज यांची कळकळीची विनंती

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चिदंबरम यांना अटक केल्यानंतर रात्री उशिरा त्यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात वैद्यकिय तपासणीसाठी नेण्यात आले. त्यानंतर त्यांना सीबीआयच्या मुख्यालयामध्ये ठेवण्यात आले. आज त्यांना सीबीआय कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजता सीबीआय त्यांना कोर्टामध्ये हजर करणार असून १४ दिवसांची कोठडी मागणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटीस