पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमेरिकेत कोरोनाचं तांडव, मृतांचा आकडा ६० हजार पार

मणिपूरही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मुक्त राज्य झाले आहे.  (संग्रहित छायाचित्र)

अमेरिकेत कोरोना विषाणूचा विळखा आणखी घट्ट होत चालला आहे. अमेरिकेत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. २४ तासांमध्ये अमेरिकेत २ हजार ५०२ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्याचसोबत अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा ६० हजार ८५३ वर पोहचला आहे. 

ऋषी कपूर यांच्या प्रकृतीत बिघाड, रिलायन्स रुग्णालयात दाखल

चीनच्या वुहान प्रांतातून परसरलेल्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. जगातील अमेरिका या देशात कोरोनाने सर्वांत जास्त नागरिकांचा बळी घेतला आहे. अमेरिकेत आतापर्यंत १० लाखांपेक्षा अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १ लाख ४७ हजार रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

MLC नियुक्तीच्या प्रस्तावानंतर CM ठाकरेंची PM मोदींसोबत फोन पे चर्चा

दरम्यान, अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरामध्ये कोरोनाची लागण झालेले ३ लाखांपेक्षा जास्त नागरिक आहेत. तर २३ हजार रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. न्यूजर्सीमध्ये १ लाखांपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर ६ हजार रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. यानंतर मॅसाचुसेट्स शहरामध्ये ६० हजार, इलिनोझसमध्ये ५० हजार आणि कॅलिफोर्नियामध्ये ४८ हजार कोरोनाबाधित रुग्ण आहेत. 

५९७ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९,९१५ वर