पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशात कोरोनाचे ६०% रुग्ण या राज्यातील

कोरोना विषाणू

देशात शुक्रवार सकाळपर्यंत कोरोना बाधितांचा आकडा हा १३ हजार ३८७ वर पोहोचला. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार यापैकी ११ हजार २०१ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत, तर १ हजार  ७४८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडूत कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशात एकूण कोरोना विषाणू बाधित रुग्णांपैकी ६०% रुग्ण हे महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, राजस्थान आणि मध्य प्रदेशमधले आहेत. शुक्रवार सकाळपर्यंत हाती आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार या राज्यात कोरोना बाधितांची संख्या किती ते पाहू..

तबलीगी जमातच्या लोकांना आश्रय देणाऱ्या ११ जणांना कोरोना

महाराष्ट्र 
राज्यात सकाळपर्यंत जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार कोरोना रुग्णांची संख्या ही ३ हजार २०५ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ३०० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

दिल्ली 
कोरोना विषाणू बाधितांची दुसरी मोठी संख्या ही दिल्लीत आहेत. दिल्लीत कोरोनाबाधीतांचा आकडा हा १६४० वर पोहोचला आहे. ५१ रुग्ण कोरोनावर मात करुन बरे झाले आहेत.

तामिळनाडू
तामिळनाडूत रुग्णांची संख्या ही १२६७ आहे आतापर्यंत इथे १८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

पाच दिवसांत धारावीत कोरोना रुग्णांच्या संख्येत तिप्पटीनं वाढ

राजस्थान 
शुक्रवारी राजस्थानमध्ये कोरोना विषाणू बाधितांचा आकडा हा १ हजार १३१ वर पोहोचला आहे.  इथे १६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

मध्य प्रदेश
मध्य प्रदेशमध्ये कोरोना विषाणू बाधितांचा आकडा हा १ हजार १२० वर पोहोचला आहे. आतापर्यंत येथे कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा हा ५३ आहे तर ६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

आनंदाची बातमी: राज्यात कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ

(टीप : ही आकडेवारी आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या माहितीवरुन घेतली आहे. हा आकडा शुक्रवार सकाळपर्यंतचा आहे.)