पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमेरिकेत कोरोनाचं तांडव, आतापर्यंत ५४,००० जणांचा मृत्यू

कोरोना

अमेरिकेत गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानं १ हजार ३३० लोकांचा मृत्यू झाला आहे, अशी आकडेवारी रविवारी जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीनं रात्री उशीरा जाहीर केली.  अमेरिकेत आता कोरोना विषाणूच्या संसर्गानं मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा हा ५४ हजार ८४१ वर पोहोचला आहे तर ९ लाख ६४ हजार ९३७ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. 

'किम जोंग उन जिंवत आणि प्रकृती ठिक'

आतापर्यंत कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेला बसला आहे. संसर्ग झालेल्यांची आणि मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ही अमेरिकेतच सर्वाधिक आहे. तर भारतात विचार करायचा झालाच तर भारतात कोरोना बाधितांचा आकडा हा  २७ हजारांवर पोहचला आहे. आरोग्य विभागाने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये आतापर्यंत २७ हजार ८९२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. यामधील २० हजार ८३५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ६ हजार १८५ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत ८७२ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

'ना'पाक डाव; ४५० दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत