पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदी सरकारने मागील दोन वर्षांत दिल्या ३.८१ लाख नव्या नोकऱ्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी

देशात रोजगार मिळत नसल्याकारणाने विरोधी पक्षांकडून सातत्याने सरकारवर हल्लाबोल होताना दिसतो. याचदरम्यान केंद्र सरकारने मात्र आपल्या विविध संस्थांमधून मागील दोन वर्षांत ३.८१ लाखांहून अधिक रोजगार दिल्याचा दावा केला आहे. अर्थसंकल्प २०१९-२० च्या दस्ताऐवजानुसार १ मार्च २०१७ पर्यंत विविध सरकारी संस्थांमधील कर्मचाऱ्यांची संख्या ३२,३८,३९७ होती. जी १ मार्च २०१९ मध्ये वाढून ३६,१९,५९६ झाली आहे. याचपद्धतीने दोन वर्षांदरम्यान सरकारी संस्थांमध्ये रोजगारात ३,८१,१९९ इतकी वाढ झाली आहे. 

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या कार्यकाळात देशात बेरोजगारी वाढल्याचा आरोप काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष सातत्याने करत असतात. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटबंदीची घोषणा केली होती. त्यानंतर विरोधी पक्ष रोजगाराच्या मुद्यावर सरकारला घेरताना दिसले आहे. अर्थसंकल्पातील दस्ताऐवजानुसार, या कालावधीत  सर्वाधिक ९८.९९९ लोकांना रेल्वे मंत्रालयात नोकरी मिळाली आहे. मार्च २०१७ मध्ये रेल्वे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची संख्या १२.७ लाख होती. जी १ मार्च २०१९ मध्ये वाढून १३.६९ लाख झाली. 

याचदरम्यान पोलिस दलात सुमारे ८०००० नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. दर अप्रत्यक्ष कर विभागात ५३००० आणि प्रत्यक्ष कर विभागात २९,९३५ लोकांना रोजगार मिळाला आहे. १ मार्च २०१७ मध्ये अप्रत्यक्ष कर विभागाच्या कर्मचाऱ्यांची संख्या ५३,३९४ आणि प्रत्यक्ष कर विभागात ५०,२९८ होती. संरक्षण मंत्रालयात ४६,३४७ नवीन रोजगाराची निर्मिती झाली आहे. मार्च २०१७ मध्ये विभागात कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या ४२३७० होती. जी मार्च २०१९ मध्ये वाढून ८८७१७ झाली.

अर्थसंकल्पानंतर सेन्सेक्समधील घसरण सुरुच

दस्ताऐवजानुसार या दरम्यान अणु ऊर्जा विभागात सुमारे १००००, दूरसंचार विभागात २२५०, जल संधारण, नदी विकास आणि गंगा पुनरुद्धार विभागात ३९८१ नवीन रोजगाराची संधी निर्माण झाली. अशाच पद्धतीने विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागात ७७४३, खाण मंत्रालयात ६३३८, अंतरिक्ष विभाता २९२०, कार्मिक आणि ग्राहक तक्रार आणि पेन्शन विभागात २०६५ आणि परराष्ट्र मंत्रालयात १८३३ रोजगार निर्माण झाले. याच दोन वर्षांच्या कालावधीत संस्कृती मंत्रालयात ३६४७, कृषि, सहकारिता आणि कृषक कल्याण विभागात १८३५ आणि नागरी उड्ड्यण मंत्रालयात ११८९ नवीन नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत.

हल्ली सरकारवर टीका करणारा देशद्रोही ठरतोः शबाना आझमी