पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कर्नाटकमधील घडामोडींशी आमचा संबंध नाही - राजनाथ सिंह

राजनाथ सिंह

कर्नाटकमध्ये सध्या काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या गोटात ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत, त्याचा भाजपशी काहीही संबंध नाही. आमचा पक्ष कधीच घोडेबाजारामध्ये पडत नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी लोकसभेत सांगितले. गेल्या शनिवारपासून कर्नाटकमधील एच डी कुमारस्वामी यांचे सरकार अस्थिर झाले आहे. काँग्रेस आणि जनता दलाचे काही आमदार एका मागून एक राजीनामे देत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी हे वक्तव्य केले आहे.

राजनाथ सिंह म्हणाले, संसदीय लोकशाहीचे पावित्र्य जपण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. राजीनामा देण्याची सुरुवात ही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापासून झाली. राहुल गांधी यांनी स्वतः राजीनामा दिल्यावर त्यांनी अनेक ज्येष्ठ नेत्यांनाही राजीनामा देण्याची सूचना केली. यानंतर काँग्रेसमधील नेते राजीनामा देऊ लागले आहेत. 

कर्नाटक Live: काँग्रेसच्या २१ मंत्र्यांचा राजीनामाः सिद्धरामय्या

कर्नाटकमधील सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसच्या सर्व २२ मंत्र्यांनी राजीनामा दिला असल्याचे पक्षाचे गटनेते सिद्धरामय्या यांनी सांगितले. त्याचवेळी कर्नाटकमधील अपक्ष आमदार आणि मंत्री नागेश यांनीही सोमवारी सकाळी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर ते एका विशेष विमानाने मुंबईला रवाना झाल्याचे एएनआयने म्हटले आहे.