पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

CAA कायद्यासंदर्भातील जनजागृतीसाठी BJP राबवणार ही विशेष मोहीम

भाजप देशभरातील ३ कोटी कुटुंबियांपर्यंत जावून कायद्यासंदर्भातील माहिती देण्याची योजना आखत आहे

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. विविध राज्यात या कायद्याच्या विरोधात हजारोच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. आंदोलनकर्त्यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या ही लक्षणीय आहे. मुस्लीम समाजामध्ये या कायद्यासंदर्भात भय निर्माण झाले असून या समाजातील जनसमुदाय देखील नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करताना पाहायला मिळत आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष यांच्यात या कायद्यावरुन चांगलीच जुंपली असून काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष केंद्रातील भाजप सरकार सुधारित नागरिकत्व  कायद्याच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करत आहेत. तर दुसरीकडे या कायद्यासंदर्भात विरोधक चुकीचा प्रसार करुन राजकारण करत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. 

नागरिकत्व कायद्यावरून धार्मिक, सामाजिक सलोखा संपविण्याचे काम - पवार

देशभरात या कायद्याच्या विरोधात संतप्त आंदोलन होताना दिसत असले तरी भाजप आजही आपल्या निर्णयावर ठाम आहे. आपला निर्णय जनतेला पटवून देण्यासाठी भाजपने आता लोकांपर्यंत जाऊन त्यांना या कायद्यासंदर्भात माहिती देण्याची योजना आखली आहे. भाजपचे नेते भुपेंद्र यादव यांनी एएनआयला यासंदर्भात माहिती दिली आहे. आगामी दहा दिवसांत भाजप एक विशेष मोहिम राबवणार असल्याचे भुपेंद्र यादव यांनी म्हटले आहे. या मोहिमेच्या अंतर्गत देशातील ३ कोटी कुटुंबियांशी सपर्क साधून त्यांना सुधारित नागरिकत्व कायद्यासंदर्भात माहिती देण्यात येणार आहे. देशातील वेगवेगळ्या २५० ठिकाणी पत्रकार परिषद बोलवून सुधारित नागरिकत्व कायद्यासंदर्भात जनतेमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद दिल्ली पोलिसांच्या ताब्यात

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरामध्ये जोरदार आंदोलन सुरु आहे. हा कायदा लागू झाल्यानंतर ईशान्य भारतातून सुरु झालेले आंदोलन राजधानी दिल्ली आणि त्यानंतर या आंदोलनाचे लोण हळूहळू देशाच्या कानाकोपऱ्यात पसरत गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही ठिकाणच्या आंदोलनाने हिसंक वळण घेतल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. यावर तोडगा काढण्याच्या दृष्टिने भाजपने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Our party has decided that in the coming 10 days we will launch a special campaign and contact over 3 crore families for Citizenship Amendment Act Sasy BJP leader Bhupender Yadav in Delhi