पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...नाहीतर काश्मीर हातातून जाईलः दिग्विजय सिंह

दिग्विजय सिंह

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी काश्मीरची समस्या लवकर सोडवली नाही तर ते राज्य आपल्या हातातून जाईल, अशी भीती व्यक्त केली आहे. त्यांनी याबाबत रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना आवाहन केले आहे. 

'नो समझौता', भारताकडून पाकला जशास तसे उत्तर

सिहोर दौऱ्यावर आलेल्या दिग्विजयसिंह यांनी कलम ३७० बाबत माध्यमांसमोर भाष्य केले. मी तुम्हाला म्हटले होते की, जर कलम ३७० हटवले तर त्याचे गंभीर परिणाम होतील. पाहा, आता काश्मीर जळत आहे. त्यांनी (पंतप्रधान नरेंद्र मोदी) आपल्या हातात आता जळता निखारा घेतला आहे. काश्मीरला वाचवणे आपले कर्तव्य आहे, असे म्हटले.

Article 370: राज्यसभेत विधेयक सादर करण्यापूर्वी मनात भीती होती - शहा

दरम्यान, यापूर्वी दिग्विजय सिंह यांनी संसदेतही कलम ३७० हटवण्याच्या निर्णयास विरोध केला होता. त्याचबरोबर त्यांनी सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्तीचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले.

कलम ३७०: भारताला मिळाली 'या' ८ देशांची साथ