पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

EVM आणि VVPAT यातील मते जुळली नाही तर काय?, विरोधकांचा निवडणूक आयोगाला सवाल

विरोधी पक्षांचे नेते निवडणूक आयोगाला भेटणार

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे दोन दिवस शिल्लक असतानाच देशातील २१ विरोधी पक्षांचे प्रतिनिधी मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेण्याच्या तयारीत आहेत. मतमोजणीच्या दिवशी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचे ट्रॅकिंग करावे आणि व्हीव्हीपॅटमधील मतांची अधिकाधिक मोजणी करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यासाठी विरोधकांना एकत्र करण्याचे प्रयत्न करीत आहेत.

जर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट मशीन या मधील मतांचा आकडा एकसारखा आला नाही. तर काय करायचे, यावर अद्याप निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. जर एखाद्या मतदारसंघातील एकाही ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मते जुळली नाहीत. तर त्या मतदारसंघातील सर्वच व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांची मोजणी केली जावी. लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास टिकून राहण्यासाठी हे खूप आवश्यक आहे, असे विरोधकांचे म्हणणे आहे.

'आता पुढची तयारी', अखिलेश-मायावती यांच्यात तासभर चर्चा

कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, सीताराम येचुरी, काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी, अहमद पटेल यांचा या शिष्टमंडळात समावेश असणार आहे. शिष्टमंडळात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या नेत्यांनाही घेण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे एका नेत्याने सांगितले.

या संदर्भात अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, जर एखाद्या मतदारसंघात ज्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅटच्या मतांची फेरजुळणी केली जाणार आहे. तिथे जर दोन्ही मध्ये फरक असल्याचे आढळून आले तर या स्थितीत काय करायचे हे निवडणूक आयोगाने अद्याप स्पष्ट केलेले नाही.

NDA ची मोठी बैठक, दिग्गज नेते सहभागी होणार

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातील मतदानावर लोकांचा विश्वास वाढावा, यासाठी एका लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रांमधील पाच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांची जुळणी होते की नाही हे पाहावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत.