पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

CAA वरुन मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्षांची आज बैठक

सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मनमोहन सिंग

सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन (सीएए) देशभरात होत असलेले आंदोलन आणि त्यामुळे विविध विद्यापीठात होत असलेल्या हिंसाचारावरुन सोमवारी विरोधी पक्षांनी बैठक बोलावली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. १३) समान विचारधारा असलेल्या पक्षांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून यात सीएएशी निगडीत मुद्द्यांवर विस्तृत चर्चा होईल. त्याचप्रमाणे मोदी सरकारला संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय सत्रादरम्यान रस्त्यावरही घेरण्यासाठी या पक्षांना बरोबर घेण्याचा प्रयत्न असेल. 

..तर उद्धव ठाकरे सत्तेतून बाहेर पडतील, गडाखांचा इशारा

बहुजन समाज पार्टी (बसपा) सोमवारी होत असलेल्या बैठकीला उपस्थित राहणार नाही. बसपाप्रमुख मायावती यांनी याबाबतचे टि्वट केले आहे. काँग्रेसबरोबरील मतभेदामुळे बसपाने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. 

उद्धवजी राऊतांना आवरा, मुजोरी खपवून घेणार नाही, संभाजीराजे भडकले

तृणमूल काँग्रेस प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आधीच या बैठकीला येण्यास नकार दिला आहे. सीएएविरोधात विरोधी पक्ष जेव्हा राष्ट्रपतींकडे गेले होते. त्यावेळीही बसपा त्यांच्याबरोबर नव्हते. परंतु, त्यानंतर पक्षाने या मुद्द्यावरुन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती.