पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

CAAविरोधात संसद परिसरात विरोधकांचे आंदोलन

विरोधकांचे आंदोलन

आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी काँग्रेससह विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसद परिसरातील गांधी पुतळ्यासमोर नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी, एनपीआर आणि अर्थसंकल्पिय अधिवेशनाविरोधात आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी या देखील सहभागी झाल्या आहेत.

ओलीस ठेवलेल्या आरोपीच्या पत्नीला जमावाकडून जबर मारहाण, अखेर मृत्यू

'द्वेषाचे राजकारण बंद करा, विषारी राजकारण बंद करा' तसंच संविधानाला वाचवा, देशाला वाचवा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. या आंदोलनात सर्व विरोधी पक्षाचे खासदार सहभागी झाले आहेत. अर्थव्यवस्थेतील अपयश लपवण्यासाठी सरकार सीएए, एनपीआर आणि एनआरीसारखे मुद्दे पुढे करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केला आहे. 

जम्मूमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा, ट्रकमधून निघाले होते

दरम्यान, संसदेचे अर्थसंकल्पिय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होईल. आर्थिक मंदी दरम्यान हा अर्थसंकल्प मांडण्यात येणार असल्याने महत्वाचा मानला जात आहे. 

जम्मूमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा, ट्रकमधून निघाले होते

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:opposition leaders protest in front of gandhi statue in parliament premises against caa and nrc