पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'नागरिकत्व कायद्यासंदर्भात जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा डाव'

अमित शहा

नागरिकत्व कायद्यामुळे देशात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाच्या स्पष्टीकरणानंतर आता गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा एकदा या कायद्याचा उद्देश देसवासियांना पटवून देण्याचा प्रयत्न केलाय. दिल्लीतील जामिया विद्यापीठानंतर सीलमपूरमधील आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यानंतर शहांनी विरोधकांवर निशाणा साधला.

सरकार जनतेचा आवाज दाबत आहे; सोनिया गांधींचा आरोप

या कायद्यासंदर्भात विरोधक जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी विरोधकांवर केला. अमित शहा म्हणाले की, मी पुन्हा एकदा देशवासियांना सांगू इच्छितो की, या कायद्यामुळे देशातील अल्पसंख्यांक समुदायावर कोणताही अन्याय होणार नाही. देशातील अल्पसंख्यांकांचे नागरिकत्व रद्द करण्याची कोणतीही तरतूद या कायद्याममध्ये नाही.

CAB : दिल्लीतील आंदोलनाला पुन्हा हिंसक वळण  

ते पुढे म्हणाले, हा कायदा नेहरु-लियाकत कराराचा हिस्सा आहे, हे काँग्रेसने लक्षात घ्यायला हवे. मागील ७० वर्षांपासून मताचे राजकारण करत त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. आमच्या सरकारने नेहरु-लियाकत कराराचे कायद्यात रुपांतर करुन अनेकांना नागरिकत्व देण्याचा मार्ग मोकळा केला आहे.