पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मतदान यंत्रात फेरफार केला जाणार नाही हे पाहणे निवडणूक आयोगाचीच जबाबदारी'

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये कोणताही फेरफार होणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर आहे. या संदर्भात उपस्थित करण्यात येणाऱ्या सर्व शंकांना त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली पाहिजेत, असे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटले आहे. सोमवारीच एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात प्रणव मुखर्जी यांनी निवडणूक आयोगाच्या आतापर्यंतच्या कामाचे कौतुक केले होते. 

निवडणूक आयुक्तांचे प्रणव मुखर्जींकडून कौतुक

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार केला जात असल्याचे काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रणव मुखर्जी यांच्या निरीक्षणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. मतदान यंत्रांमध्ये फेरफार केला जात असल्याच्या आरोपांमुळे आपण चिंतीत आहोत. पण इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र सुरक्षित आहेत, यावर लोकांचा विश्वास बसेल, यासाठी उपाय योजण्याचे काम निवडणूक आयोगानेच केले पाहिजे. ती त्यांचीच जबाबदारी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात फेरफार केले जात असल्याचे आरोप निवडणूक आयोगाने फेटाळले आहेत. जे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ते चुकीचे आहेत. त्याबद्दल स्थानिक पातळीवर संबंधितांना पुराव्यानिशी उत्तरे देण्यात आली आहेत, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

EVM आणि VVPAT यातील मते जुळली नाही तर काय?, विरोधकांचा निवडणूक आयोगाला सवाल

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातील मतदान आणि व्हीव्हीपॅट यंत्रातील मतदान यांची फेरजुळणी करा, या मागणीसाठी दिल्लीमध्ये आज २० राजकीय पक्षांचे नेते एकत्र आले होते. त्यांनी या प्रकरणी निवडणूक आयोगाची भेटही घेतली आहे.