पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बंगाली व्यक्तीच भाजपचा मुख्यमंत्री होईल - अमित शहा

अमित शहा

पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेवर आल्यास बंगाली व्यक्तीच राज्याचा मुख्यमंत्री होईल, असे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले आहे. भाजपने यंदा पश्चिम बंगालवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. तृणमूल काँग्रेसला राज्यात हारविण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील, असे संकेतच पक्षाने दिले आहेत.

रोड शो दरम्यानच्या हिंसाचारात TMC च्या गुंडांचा हात : अमित शहा

अमित शहा एका कार्यक्रमात म्हणाले, आम्ही बाहेरचे आहोत, असे सांगून लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करू नका. मी किंवा पक्षाचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय येथून निवडणूक लढवणार नाही. जर भाजप या राज्यात सत्तेत आला. तर बंगाली व्यक्तीच राज्याचा मुख्यमंत्री होईल. अन्य कोणीही होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. कोलकाताच्या उत्तरेकडील भागात एका हॉटेलमध्ये शहरातील बुद्धिजनांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कैलाश विजयवर्गीय हे मध्य प्रदेशमधून येतात. त्यांच्यावर पक्षाने पश्चिम बंगालची जबाबदारी सोपविली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी एक एक जागा महत्त्वाची आहे. त्यामुळे पक्षाने सर्वच ठिकाणी विशेष मेहनत घेतली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या जागा वाढण्याचे संकेत असल्यामुळे अमित शहा यांनी या राज्यात जास्त लक्ष घातले आहे. मंगळवारी त्यांच्या रोड शोवेळी कोलकातामध्ये हिंसाचार झाला होता. तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी हा हिंसाचार घडवून आणल्याचे त्यांनी म्हटले होते.

अमित शहांच्या रोड शोमध्ये हिंसाचार, पोलिसांचा लाठीचार्ज

ममता बॅनर्जी यांच्याकडून सध्या जो प्रचार सुरू आहे. त्यावरून गोंधळून जाऊ नका, असे सांगून अमित शहा म्हणाले, बाहेरून कोणीही इथे येणार नाही. बंगाली व्यक्तीच इथला मुख्यमंत्री होईल आणि आमचे सर्व खासदारही बंगालच्या मातीतूनच आलेले असतील.

पुढच्या वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका होता आहेत.