पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नाशिकमधील २२ लाखांचे कांदे मध्यप्रदेशमध्ये चोरीला

प्रातिनिधिक छायाचित्र

कांद्याच्या गगनाला भीडलेल्या भावामुळे सगळेच हैराण आहेत. अनेक ठिकाणी कांद्याच्या दरानं प्रतिकिलोमागे शंभरी पार केली आहे. अशातच एका घाऊक कांदे विक्रेत्यानं नाशिकमधून उत्तरप्रदेशमध्ये विक्रीसाठी जात असलेले २२ लाखांचे कांदे चोरीला गेल्याचा आरोप केला आहे. 

'महाराष्ट्रातील लहान भावाला पंतप्रधानांनी साथ द्या'

जवळपास २२ लाख किंमतीचा ४० टन माल नाशिकमधून गोरखपूरमध्ये विक्रीसाठी जात होता. मात्र ज्या ट्रकमधून हा माल नेला जात होता तो मध्यप्रदेशमधल्या शिवपुरी  जिल्ह्यात आढळला. त्यातला लाखोंचा माल चोरीला गेल्याची तक्रार प्रेम चंद्र शुक्ला या विक्रेत्यांनं  पोलिस स्थानकात केली आहे. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोर्टाचे समन्स

ट्रक नाशिकमधून ११ नोव्हेंबरला चाळीस टन कांदे घेऊन निघाला होता. गोरखपूरमध्ये हा माल २२ नोव्हेंबरला पोहोचणं अपेक्षित होतं, मात्र हा माल पोहोचला नाही. शुक्ला यांनी शिवपुरी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचं आश्वासन त्यांना दिलं आहे.