पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रियांका गांधींच्या सक्रीय राजकारणाचे एक वर्ष आणि सहा मुद्दे

प्रियांका गांधी

प्रियांका गांधी यांनी सक्रीय राजकारणात येऊन एक वर्ष झाले. गेल्यावर्षी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रीय राजकारणात येण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्याकडे पक्षाने राष्ट्रीय सरचिटणीस पद देऊन उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपविली होती. पण त्यानंतर घडलेल्या घडामोडी पाहता प्रियांका गांधी राजकारणात आपला छाप उमटविण्यात आणि काँग्रेसला यश मिळवून देण्यात यशस्वी ठरल्याचे तूर्ततरी दिसत नाही. प्रियांका गांधींकडे जबाबदारी असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चमकदार कामगिरी करता आली नाही.

काही मुद्दे
१. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आपला पारंपरिक मतदारसंघ अमेठी गमवावा लागला. या मतदारसंघातून काँग्रेसचे तत्कालिन अध्यक्ष राहुल गांधी यांना पराभव स्वीकारावा लागला होता. भाजपच्या स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला. उत्तर प्रदेशात काँग्रेसला केवळ रायबरेली मतदारसंघात यश मिळाले. या मतदारसंघातून काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी विजयी झाल्या.

चीनमध्ये नव्या आजाराने चौघांचा बळी, आरोग्य संघटनेची तातडीची बैठक

२. २०१७ मधील उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत आणि २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस चमकदार कामगिरी करू शकला नाही. देशाच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची अस्तित्त्वाची लढाई सुरू असल्याचे दिसते. प्रियांका गांधी राजकारणात सक्रीय झाल्यानंतर त्यात फारसा फरक पडलेला नाही. 

३. लोकसभा निवडणुकीनंतरही प्रियांका गांधी यांनी आपला फोकस उत्तर प्रदेशवरच ठेवला. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात उत्तर प्रदेशात झालेल्या आंदोलनाचे नेतृत्त्व त्यांनीच केले. उत्तर प्रदेशात भाजपसरकारविरोधात विद्यार्थी चळवळीला दिशा देण्याचे आणि त्यांचे नेतृत्त्व करण्याचे काम प्रियांका गांधी यांनी केले.

४. प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशमधील कायदा आणि सुव्यवस्थेवरून तेथील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर सातत्याने टीका केली. उत्तर प्रदेशात बलात्काराच्या गुन्ह्यात वाढ झाली असल्याचे सांगत त्यावरही त्यांनी आवाज उठविला.

५. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात प्रियांका गांधी यांनी अजिबात सहभाग घेतला नव्हता. प्रचाराच्या काळात त्यांनी महाराष्ट्रात एकही जाहीर सभा घेतली नाही.

भारतातील ६३ अब्जाधीशांकडे देशाच्या बजेटपेक्षा अधिक संपत्ती

६. प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशात २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. उत्तर प्रदेशात जातीचे समीकरण नक्की काय आहे, हे समजून घेण्यासाठी तेथील ४०३ मतदारसंघांमध्ये दलित, ओबीसी आणि मुस्लिम समाजाची मते नक्की किती आहेत, याची माहिती गोळा करण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिले आहेत.