पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राम जन्मभूमी ट्रस्टमधील एक विश्वस्त कायम दलित समाजातील - अमित शहा

राम मंदिरप्रश्नी नोव्हेंबरमध्ये निकाल येणार आहे

अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी तयार करण्यात येणाऱ्या श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमधील एक विश्वस्त कायम दलित समाजातील असेल, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी दिली. या ट्रस्टमध्ये एकूण १५ विश्वस्त असतील, असेही त्यांनी सांगितले. या ट्रस्टच्या निर्मितीचा आराखडा पूर्णपणे तयार झाला असल्याची आणि त्याच्या नावाची घोषणा बुधवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केली. त्यानंतर अमित शहा यांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली.

मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगितीस सुप्रीम कोर्टाचा नकार

अमित शहा यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमध्ये एकूण १५ विश्वस्त असतील. त्यापैकी एक विश्वस्त कायम दलित समाजातील असेल. सामाजिक सौहार्द मजबूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा अभूतपूर्व निर्णय घेतला आहे. याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.

अयोध्येतील राम मंदिरासाठी ट्रस्ट निर्मितीची पंतप्रधानांकडून घोषणा

लोकसभेत नरेंद्र मोदी यांनी या ट्रस्ट संदर्भात निवेदन केले आहे. या निवेदनावेळी त्यांनी रामजन्मभूमी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर देशातील नागरिकांनी लोकशाही व्यवस्थेबद्दल नितांत आदर व्यक्त केला. त्याबद्दल देशातील १३० कोटी नागरिकांना मी सलाम करतो, असे सांगितले. अयोध्येतील ६७.७० एकर जागा श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडे देण्याचा निर्णयही त्यांनी लोकसभेत सांगितला.