पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन; एक जवान शहीद

जवान

जम्मू-काश्मीरच्या सीमा भागामध्ये पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहे. शुक्रवारी सकाळी पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. कृष्णाघाटी सेक्टरमध्ये पाकिस्ताने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून यामध्ये एक जवान शहीद झाला आहे.

यापूर्वी, पाकिस्तानी सैन्यांनी सोमवारी जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील अग्रिम चौकीजवळ शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. मागच्या आठवड्यात पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर १३ जण जखमी झाले होते.