पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कमलनाथ यांच्या राज्यात 'ऑपरेशन लोटस'ची तयारी?

मध्य प्रदेश मुख्यमंत्री कमलनाथ

मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ सरकारवर पुन्हा एकदा संकटात सापडल्याचे संकेत दिसत आहे. जोतिरादित्य शिंदे गटातील सहा मंत्र्यांसह १७ आमदार बंगळुरुमध्ये पोहचले आहेत. यापूर्वी काँग्रेसचे गायब असलेले बिसाहूलाल सिंह यांनी रविवारी भोपाळमध्ये कमलनाथ यांची भेट घेतली होती. 

CAA आंदोलनावेळी अपप्रचार केल्यावरून PFI चा सदस्य अटकेत

प्रसारमाध्यमातील वृत्तांनुसार, इमरती देवी, प्रद्युमन सिंह तोमर, गोविंद सिंह राजपूर आणि महेन्द्र सिंह सिसोदिया या मंडळींचा देखील बंगळुरुमध्ये पोहचलेल्या ताफ्यात समावेश आहे. ही मंडळी बंगळुरुच्या आउटस्कर्ट परिसरातील रेस्टोरंटमध्ये थांबल्याचे वृत्त आहे. काँग्रेसचे वरिष्ठ आमदार आणि माजी मंत्री बिसाहूलाल सिंह यांनी रविवारी भापाळस्थित मुख्यमंत्री निवासस्थानी कमलनाथ यांची भेट घेतली होती. या भेटी दरम्यानचा एक फोटोही समोर आला होता. यात बिसाहूलाल सिंह, मुख्यमंत्री कमलनाथ आणि काँग्रेसचे अन्य काही नेते मंडळी दिसली होती. हरदीप सिंह डंग आणि रघुराज कसाना मागील आठवड्याभरापासून गायब आहेत. डंग यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देखील पाठवल्याचे समजते.  

कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण कर्नाटकात हॉस्पिटलमधून पळाला

कमलनाथ यांची भेट घेतल्यानंतर  बिसाहूलाल सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. ते म्हणाले होते की, मला कोणीही कुठे नेले नव्हते तर मी तिर्थ यात्रेला गेलो होतो. यावेळी त्यांनी कमलनाथ सरकारला पाठिंबा दर्शवला होता. कमलनाथ यांची भेट घेतल्यानंतर  बिसाहूलाल सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. ते म्हणाले होते की, मला कोणीही कुठे नेले नव्हते तर मी तिर्थ यात्रेला गेलो होतो. यावेळी त्यांनी कमलनाथ सरकारला पाठिंबा दर्शवला होता. पाच दिवसांपूर्वी दोन राज्य मंत्र्यांना ६ आमदारांना एका विशेष विमानाने मध्य प्रदेशमध्ये आणण्यात आले होते. यात बसपाचे संजीव कुशवाह आणि रामबाई तसे सपाचे राजेश शुक्ला आणि काँग्रेसचे ऐदल सिंह कंसाना, रणवीर जाटव आणि कमलेश जाटव यांचा समावेश होता. या सर्वांनी काँग्रेसोबत असल्याचे सांगितले होते. कोणत्याही प्रकारे प्रलोबनाखाली नाही, असेही त्यांनी म्हटले होते.   

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:once again crisis on Madhya Pradesh Kamalnath government 17 MLAs including six ministers arrived in Bengaluru