पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेस नेते शिवकुमार यांना जामीन मंजूर

डी के शिवकुमार

कर्नाटकमधील काँग्रेस नेते डी के शिवकुमार यांना बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. बुधवारी सकाळीच तिहार तुरुंगात जाऊन काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शिवकुमार यांची भेट घेतली होती. शिवकुमार यांना आर्थिक गैरव्यवहारांच्या प्रकरणात गेल्या महिन्यात अटक करण्यात आली होती. २५ लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

जम्मू-काश्मीरः पाकिस्तानच्या गोळीबारात नगरचे सुनील वाल्ते शहीद

गुजरातमधील २०१७ च्या राज्यसभा निवडणुकीवेळी तेथील काँग्रेसच्या आमदारांना शिवकुमार यांच्या रिसॉर्टवरच ठेवण्यात आले होते. बंगळुरू शहराच्या बाह्य भागात शिवकुमार यांचे रिसॉर्ट आहे. काही दिवसांपूर्वीच प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिवकुमार यांच्या निवासस्थानी, त्यांच्या कार्यालयामध्ये छापे टाकले होते. या छाप्यावेळी सुमारे ८.८२ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती प्राप्तिकर विभागाने दिली होती. 

'प्रियांका गांधी काय म्हणतात याला काही किंमत नाही'

सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी ३ सप्टेंबर रोजी शिवकुमार यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली होती.