पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सर्वांनाच हिंदू म्हणणे अयोग्य, भागवतांच्या विधानाशी आठवले असहमत

रामदास आठवले आणि मोहन भागवत

देशातील सर्व १३० कोटी जनता हिंदू समाजाचा हिस्साच आहे, या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याशी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी असहमती दर्शवली आहे. भागवत यांनी असे म्हणणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले. 

गुरुवारी रामदास आठवले यांनी मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, सर्वजण हिंदू आहेत, हे म्हणणे योग्य नाही. एक वेळ अशी होती, जेव्हा या देशात सर्वजण बौद्ध होते. पण जेव्हा हिंदुत्व आले, तेव्हा हिंदू राष्ट्र झाले. पण भागवत यांच्या बोलण्याचा अर्थ हा आपण सर्वजण एक आहोत, असे असेल तर ती चांगली गोष्ट आहे. 

जेवणात कांदा दिला नाही म्हणून तरुणांकडून हॉटेलची तोडफोड

दरम्यान, बुधवारी आरएसएस स्वयंसेवकाच्या तीन दिवसीय 'विजय संकल्प शिबिरा'त भागवत बोलत होते. ते म्हणाले होते की, संघ भारताची १३० कोटी जनता हिंदू समाज असल्याचे मानते. मग ते कोणत्याही धर्म आणि संस्कृतीचे असोत. धर्म आणि संस्कृतीवर लक्ष न देता, जे लोक राष्ट्रवादी भावना ठेवतात आणि भारताची संस्कृती आणि त्याच्या वारसाचा सन्मान करतात, ते सर्व हिंदू आहेत. आरएसएस देशातील १३० कोटी लोकांना हिंदूच मानते. संपूर्ण समाज आपला आहे आणि संघाचा उद्धेश संघटित समाज निर्माण करणे असल्याचेही ते म्हणाले.

धक्कादायक: ग्रहणकाळात तीन विशेष मुलांना जमिनीत पुरले

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:On rss Mohan Bhagwats Remark union minister Ramdas Athawale Says Not Right To Say All Are Hindus