पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धोनीबरोबरील व्यवहाराची माहिती उद्यापर्यंत द्या, कोर्टाचे 'आम्रपाली'ला आदेश

महेंद्रसिंह धोनी

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आम्रपाली समूहाला उद्यापर्यंत (बुधवार) सर्व व्यवहारांची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. आम्रपाली समूहाने पेंटहाऊस न दिल्यामुळे आणि कंपनीकडून कर्जदारांच्या यादीत नाव समाविष्ट केल्यामुळे धोनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. हजारो घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक केल्याचा आम्रपाली समूहावर आरोप आहे. ग्राहकांकडून पैसे घेऊन त्यांना घर दिला नसल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याविरोधात या ग्राहकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 

बुधवारपर्यंत धोनीशी संबधित सर्व व्यवहारांची माहिती बुधवारपर्यंत देण्याचे आदेश दिले आहेत. वर्ष २००९ ते २०१६ पर्यंत धोनी या समूहाचा ब्रँड अँबेसेडर होता. धोनीने रांची येथील आम्रपाली सफारी येथे एक पेंटहाऊस बुक केल्याचे आपल्या याचिकेत म्हटले होते.

कंपनीने आपली फसवणूक केली आहे. ब्रँड अँबेसेडर म्हणून काम केलेली रक्कम थकवल्याचा आरोप ्केला आहे. २००९ ते २०१६ या कालावधीत त्याने कंपनीचा प्रचार केला होता. कंपनीच्या अनेक जाहिरातीत तो दिसला होता. 

धोनीला अद्याप पेंटहाऊसचा ताबा मिळालेला नाही. कंपनीने धोनीचे ४० कोटी रुपयेही थकवलेले आहेत. धोनीसह त्याची पत्नी साक्षी या कंपनीच्या धर्मादाय विभागाची सदस्य आहे.

आम्रपाली समूहावर सुमारे ४५ हजार ग्राहकांना घर न दिल्याचा आरोप आहे. हजारो लोकांनी या समूहाविरोधात सोशल मीडियावर मोहीम राबवली होती. या मोहिमेनंतर धोनीने या समूहाशी असलेले नाते तोडले आणि तो ग्राहकांच्या बाजूने उभा राहिला.