सुशिक्षितांनाही शिकवावे लागते याचे हे सुयोग्य उदाहरण आहे, असे सांगत भाजपच्या नेत्या आणि खासदार मीनाक्षी लेखी यांनी मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्या नाडेला यांना मंगळवारी प्रत्युत्तर दिले. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी सत्या नाडेला यांच्या टिप्पणीला उत्तर दिले.
बजाजची इलेक्ट्रिक चेतक : रिव्हर्स गिअर, घरातच चार्ज करता येणार
देशात सध्या सुधारित नागरिकत्व कायद्यावरून गदारोळ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बझफिड न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सत्या नाडेला यांनी म्हटले होते की, सध्या जे काही घडते आहे ते अत्यंत वाईट आहे. बांगलादेशमधून भारतात आलेला स्थलांतरित इथे येऊन इन्फोसिस कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) झालेला बघायला मला आवडेल. त्यांच्या या वक्तव्यानंतर या कायद्याला विरोध करणाऱ्यांनी सत्या नाडेला यांचे कौतुक केले. तर कायद्याचे समर्थन करणाऱ्या भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी सत्या नाडेला यांना प्रत्युत्तर दिले.
दरम्यान, सत्या नाडेला यांच्या वक्तव्यानंतर लगेचच मायक्रोसॉफ्टकडून एक सुधारित निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. त्यामध्ये म्हटले आहे की, प्रत्येक देश स्वतःच्या सीमांचे रक्षण करण्यास, स्वतःच्या देशाचे रक्षण करण्यास सक्षम असला पाहिजे. प्रत्येक देशाने स्थलांतरितांबद्दलचे नियम स्वतः निश्चित केले पाहिजेत. लोकशाही देशांमध्ये तेथील सरकार आणि नागरिक यावर नक्कीच चर्चा करू शकतात. या चर्चेतून निश्चित धोरण ठरवता येऊ शकते, असे भारतीय वंशाच्या सत्या नाडेला यांना म्हणायचे होते.
'राज्याचा खेळखंडोबा केलाय, हे दिवस बघण्यापेक्षा मेलेलं बरं'
सुधारित नागरिकत्व विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात डिसेंबर २०१९ मध्ये मंजूर झाले. त्यानंतर याच महिन्यात या कायद्याची अंमलबजावणीही सुरु झाली आहे. या सुधारित कायद्यानुसार भारताच्या शेजारील पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश येथून आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन आलेल्या स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व दिले जाऊ शकते. केवळ डिसेंबर २०१४ पूर्वी आलेल्या नागरिकांना अर्ज केल्यानंतर अशा पद्धतीने नागरिकत्व दिले जाऊ शकते.