पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'कटमनी' मिळत नसल्यानेच ममतांचा केंद्राच्या योजनांना नकारः मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Photo by Samir Jana / Hindustan Times)

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या बालेकिल्यात गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहाण्याने राज्य सरकारवर जहरी टीका केली आहे. या दोन्ही नेत्यांनी पश्चिम बंगालच्या औद्योगिकरणाचे स्वप्न पाहिले होते. पण इथल्या सरकारने त्याकडे पाठ फिरवल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी कोलकाता पोर्टचे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी पोर्ट असे नामकरण केल्याचे जाहीर केले. त्यांनी ममता बॅनर्जी यांचे नाव न घेता म्हटले की, कटमनी मिळत नसल्याने केंद्राच्या योजना राज्य सरकार लागू करु देत नसल्याचा गंभीर आरोपही केला. 

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, पश्चिम बंगाल राज्य सरकार आयुष्मान भारत योजना, पीएम किसान सम्मान निधीसाठी स्वीकृती देईल. त्यावेळी येथील लोकांना या योजनांचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल. आयुष्मान भारत आणि पीएम किसान निधी योजनांना राज्य सरकार परवानगी देईन की नाही हे मला माहीत नाही, असेही ते म्हणाले. पण जर त्यांनी मंजुरी मिळाली तर येथील लोकांना या योजनांचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल. 

आयुष्मान भारत योजनेत ७५ लाख रुग्णांना गंभीर आजारावर मोफत उपचार मिळालेला आहे. कोणी मध्यस्थ नाही, कोणतेही कट नाही, जर सिंडिकेट कार्य करत नसेल तर या योजना कोण राबवणार?

ते म्हणाले, 'माझ्या मनात नेहमी वेदना राहतील आणि बंगालच्या धोरणकर्त्यांना शहाणपण यावे अशी देवाला मी प्रार्थना प्रार्थना करू इच्छितो. आयुष्मान योजना आणि पीएम किसान सन्मान निधीचा बंगाल मधील माझ्या गरीब आणि शेतकऱ्यांना मिळो.

यापूर्वीही कटमनीवरुन केंद्र सरकार आणि ममता बॅनर्जी यांच्यात वाद रंगला होता. आता पुन्हा पंतप्रधान मोदींनी यावरुनच राज्य सरकारवर निशाणा साधला.