पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राफेल पूजनावरुन खरगेंना निरुपम यांनी दिला घरचा आहेर

संजय निरुपम

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पॅरिसमध्ये राफेलच्या केलेल्या पुजनावरून अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेस नेता मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील यावर भाष्य केले होते. त्यांच्या वक्तव्याचा काँग्रेसच्याच संजय निरुपम यांनी समाचार घेतला आहे.  

अखेर राज ठाकरे यांची पुण्यातील पहिली सभा रद्द!

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, शस्त्र पूजा अंधश्रद्धा नाही. ही आपली जूनी परंपरा आहे. खडगे नास्तिक असल्यामुळे त्यांना राफेलची पूजा आवडली नसेल. काँग्रेसमध्ये सर्वच नास्तिक नाहीत, असा उल्लेखही संजय निरुपम यांनी केला.  संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राफेलची पूजा केल्यानंतर खरगे यांनी त्यांच्यासह मोदी सरकारवर निशाणा साधला होता.

स्वतः थकल्यामुळेच सुशीलकुमार शिंदेंचं 'ते' वक्तव्यः अजित पवार

आमच्या सरकारने बोफोर्स हत्याराची खरेदी केल्यानंतर मोदी सरकारप्रमाणे दिखावा केला नव्हता, असा टोला लगावला होता. राजनाथ सिंह यांनी मंगळवारी पॅरिसमध्ये जाऊन राफेलचे पूजन केले. त्यानंतर त्यांनी जवळपास ३० मिनिटे राफेलमध्ये बसून सफर केली होती. राफेलवर 'ओम' असे लिहिले होते. शिवाय उड्डाणापूर्वी चाकाखाली लिंबू देखील ठेवण्यात आले होते.