पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कर्नाटकचे सरकार पडल्यानंतर प्रियांका गांधींचे भाजपला सणसणीत प्रत्युत्तर

प्रियांका गांधी

कर्नाटकमधील एच डी कुमारस्वामी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार पडल्यानंतर आता काँग्रेसने भाजपवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजपने अत्यंत घृणास्पदरित्या घोडेबाजार करून सरकार पाडल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्याचबरोबर या विरोधात देशभर आंदोलन छेडण्याचे पक्षाने ठरविले आहे. 

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी मुदतवाढ

काँग्रेसचे मावळते अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकमध्ये जे काही घडले त्याची तीव्र निंदा केली. केवळ हव्यासापोटी हे सगळे घडविण्यात आल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले. त्यांच्यानंतर आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही या प्रकारावरून भाजपवर निशाणा साधला.

एक दिवस भाजपला हे लक्षात येईल की प्रत्येक गोष्ट विकत घेतली जाऊ शकत नाही, खोटेपणा जास्त दिवस लपून राहू शकत नाही, असे प्रियांका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी भाजपकडून देशातील संस्था उद्ध्वस्त करण्याचे काम पद्धतशीरपणे सुरू आहे, लोकशाही व्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जातो आहे, असेही म्हटले आहे.

पहिले राफेल विमान सप्टेंबरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यात

कर्नाटकमध्ये विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेण्यात कुमारस्वामी सरकार अपयशी ठरले. ९९ विरुद्ध १०५ मतांनी हा ठराव कर्नाटक विधानसभेत नामंजूर करण्यात आला. त्यामुळे मंगळवारी रात्रीच त्यांनी आपला राजीनामा कर्नाटकच्या राज्यपालांकडे सुपूर्द केला.