पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ज्योतिरादित्य शिंदेंच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमधील तरूण नेत्यांमध्ये चलबिचल

ज्योतिरादित्य शिंदे आणि जे पी नड्डा (फोटो - राज के राज)

ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेससोडून भाजपमध्ये जाणे पसंद केल्यानंतर काँग्रेसमधील तरूण नेत्यांची अस्वस्थता आता दिसून येऊ लागली आहे. काहींनी सोशल मीडियावरील आपल्या हँडल्सच्या माध्यमातून आपल्या मनात सुरू असलेल्या विचारांना मोकळी वाट करून दिली. विशेष म्हणजे पक्षामध्ये आणखी कोणी फुटून इतर पक्षात जाऊ नये, यासाठी पक्षश्रेष्ठींनी उपाय योजले पाहिजेत, अशीही मागणी समोर आली आहे.

३६५ दिवस शिवजयंती साजरी केली पाहिजेः राज ठाकरे

राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसमधून बाहेर पडणे दुर्दैवी घटना आहे. मला वाटतंय की उपाय योजण्यासाठी पक्षांतर्गत पातळीवर प्रयत्न केले जातील. 

हरियाणातील काँग्रेस नेते कुलदीप बिष्णोई यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेस सोडून जाणे हा पक्षाला मोठा धक्का आहे. ते पक्षातील महत्त्वाचा घटक होते. पक्षनेतृत्त्वाने त्यांना थांबविण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. त्यांच्याप्रमाणे आता पक्षातील इतर नेत्यांमध्येही वेगळे पडल्याची, घुसमट होत असल्याची भावना असेल. या सर्व नेत्यांच्या पाठिशी पक्ष नेतृत्त्वाने खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. 

कोरोना विषाणू इफेक्ट; अर्थसंकल्पीय अधिवेशन शनिवारपर्यंतच

ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंगळवारी काँग्रेसचा राजीनामा दिला. गेली १८ वर्षे ते काँग्रेसमध्ये सक्रीय होते. पण पूर्वीची काँग्रेस आता राहिली नाही सांगत त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.