पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंतप्रधान मोदी, सोनिया गांधींसह नेत्यांचे पंडित नेहरुंना अभिवादन

पंडित जवाहरलाल नेहरु (Getty Images)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. देशासाठी पंडितजींनी दिलेल्या योगदानाचे नेहमी स्मरण केले जाईल, असे टि्वट मोदी यांनी केले आहे. पंडित नेहरु यांची आज ५५ वी पुण्यतिथी आहे. 

मोदींनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे की, पंडित जवाहरलाल नेहरुजींना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली. देशासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे त्यांचे स्मरण करतो. 

सोनिया गांधी आणि राहुल गांधी  ( Raj K Raj/HT Photo )

दुसरीकडे, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह इतर काँग्रेस नेत्यांनी सोमवारी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्थळावर पुष्प वाहून श्रद्धांजली वाहिली.

RSS प्रमुख भागवत म्हणाले, राम का काम करना है !