पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'जय श्रीराम'ची घोषणा ऐकताच ममतादिदी भडकल्या

ममता बॅनर्जी

लोकसभा निवडणूक संपली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधीही झाला. तरीही पश्चिम बंगालमध्ये 'जय श्रीराम' घोषणेवरुन सुरु झालेला वाद काही शमण्याचे नाव घेताना दिसत नाही. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपल्या ताफ्यासह जात असताना काही व्यक्तींच्या समूहाने 'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्या. त्यामुळे ममता बॅनर्जीं प्रचंड संतापल्या आणि रागाच्या भरात त्यांनी त्या लोकांना सुनावले, ही घटना गुरुवारी (३१ मे) घडली. 

RSS प्रमुख भागवत म्हणाले, राम का काम करना है !

ममता बॅनर्जी या बराकपूर येथे जात होते. त्यावेळी काही लोकांचा समूह त्यांच्या ताफ्यात शिरला आणि जय श्री रामच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. ममता बॅनर्जींना घोषणा देणे रुचले नाही. त्या आपल्या कारमधून उतरल्या आणि त्या लोकांना रागावू लागल्या. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ममता या त्या लोकांना गुन्हेगार म्हणताना दिसतात. 

मोदींचा पुन्हा ममतांना धक्का, हिंसाचारातील मृतांच्या नातेवाईकांना शपथविधीचे निमंत्रण

त्या म्हणाल्या की, भाजपचे लोक राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. येथील जनता शांतताप्रिय आहे. भाजप मतांचे राजकारण करत आहे. बाहेरच्या लोकांना बोलावून प. बंगालची घडी बिघडवली जात आहे. पण भाजपचा कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नाही.

राहुल गांधींना पर्याय शोधणे वाटते तितके सोपे नाही कारण की...

दरम्यान, गुरुवारी नरेंद्र मोदी हे जेव्हा शपथ घेत होते. त्यावेळी ममता बॅनर्जी या धरणे आंदोलनास बसल्या होत्या. दिल्लीत प. बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत टीएमसीचे ५० हून अधिक नगरसेवक आणि ३ आमदार भाजपत दाखल झाले होते.