पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आमचा सामना विषाशी, राहुल गांधी यांची मोदींवर टीका

राहुल गांधी (ANI)

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे वायनाड या आपल्या मतदारसंघाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी काँग्रेसचा दरवाजा हा प्रत्येक नागरिकासाठी खुला असल्याचे म्हटले. काँग्रेस पक्षाचे दरवाजे वायनाडमधील प्रत्येक नागरिकासाठी खुले आहेत. मग त्यांचे वय काहीही असो, ते कोठून येतात किंवा त्यांची विचारधारा काय, याचा काहीच फरक पडत नाही, असेही ते म्हणाले. 'एएनआय'ने दिलेल्या वृत्तानुसार राहुल गांधी हे वायनाडमधील कलपेट्टा येथील रोड शो दरम्यान बोलत होते. 

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर खासदार या नात्याने पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. देशाला विभागण्यासाठी 'तिरस्काराचे विष' वापरले जात आहे, अशी टीका त्यांनी केली. 

'..तर मी काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळण्यास तयार'

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गुरुवायर मंदिराला शनिवारी भेट दिली. तत्पूर्वी, शुक्रवारी राहुल गांधी हे वायनाडला आले. यादरम्यान त्यांनी केंद्र सरकार देशात तिरस्कार पसरवत असल्याचा आरोप केला होता. तिरस्काराचा सामना करण्याचा एकमेव मार्ग हा प्रेमाचा आहे, आणि काँग्रेस त्याचेच अनुसरण करत असल्याचे म्हटले होते.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी पक्षात पुन्हा सक्रिय