पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...म्हणून १०० दिवसांत काय झालं? काहींना समजलेचं नाही : मोदी

पंतप्रधान मोदी

भारताची विकासाच्या दिशेने सकारात्मक वाटचाल सुरु असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. दुसऱ्या हंगामातील १०० दिवसांचा कार्यकाळपूर्तीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. सरकारच्या कार्यकाळातील पहिल्या १०० दिवसांत देशाने विकास, विश्वास आणि अमुलाग्र बदलाच्या दिशेने वाटचाल केली, असे मोदी यांनी म्हटले. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत त्यांनी १०० दिवसांच्या कार्यकाळातील सरकारच्या कामगिरीवर भाष्य केले.  

कृषी सेवेपासून ते राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर सरकारने महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतले. ऐतिहासिक निर्णय घेण्यासाठी १३० कोटी जनतेकडून प्रेरणा मिळाली, असेही मोदी यावेळी म्हणाले. काश्मीर खोऱ्यातील जनतेची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.   

१०० दिवसांच्या कार्यकाळाबद्दल अभिनंदन! राहुल गांधींचा सरकारला टोमणा

गेल्या १०० दिवसांत भारताने आव्हानांना चोख प्रत्युत्तर दिल्याचे देशातील जनतेसह जगानेही पाहिले आहे. अनेक दशकांपासून अशक्यप्राय वाटणारे निर्णय सरकारने यशस्वीरित्या घेतले. तसेच भविष्यातील आव्हाने परतवण्यासाठी आपण सक्षम आहोत, असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला. मागील १०० दिवसांत काय काय झाले? हे काही लोकांना अजूनही समजलेसं नाही. कारण ते पराभवातून अजूनही सावरलेले नाहीत, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर तोफ डागली.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: on completion of 100 days of government PM Modi in Haryana says Big changes have happened in the county