पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

CAA Protest: जाळपोळ करणाऱ्यांची संपत्ती जप्त करणार- योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात गुरुवारी लखनऊमध्ये झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. अनेक ठिकाणी जाळपोळ झाली. त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उच्च स्तरीय बैठक बोलावली होती. विरोधाच्या नावावर कोणीही हिंसाचार आणि जाळपोळ करु शकत नाही. आम्ही अशा तत्वांच्या विरोधात सक्त कारवाई करणार आहोत. सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करण्यात सहभागी असलेल्या लोकांची संपत्ती जप्त करुन त्याची भरपाई केली जाईल, असा सज्जड दम योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. 

दिल्ली आंदोलन: काही मेट्रो स्टेशन सुरु, वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हैराण

दरम्यान, गुरुवारी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊसह राज्यातील अनेक शहरांमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आले. याचदरम्यान आंदोलकांनी दगडफेक, जाळपोळ, तोडफोड केली.  

CAA: भाजपने समोर आणला मनमोहन सिंग यांचा जुना व्हिडिओ

लखनऊमध्ये आंदोलकांनी २० दुचाकी, १० कार, ३ बस आणी माध्यमांच्या ४ ओबी व्हॅन पेटवल्या. अनेक ठिकाणी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा आणि बलप्रयोगाचा वापर केला. लखनऊमध्ये शुक्रवारी होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.

नागरिकत्व कायदाः लखनऊ-अहमदाबादमध्ये आंदोलनाला हिंसक वळण

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:On Arson in Lucknow during CAA Protest CM Yogi says will seize property of those who damage public property