भाजपचे खासदार ओम बिर्ला यांची बुधवारी सतराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी बहुमताने निवड झाली. विरोधकांनी ओम बिर्ला यांच्याविरोधात उमेदवार न देण्याचे ठरविले होते. त्यामुळे ओम बिर्ला यांची निवड निश्चित मानली जात होती.
बुधवारी सकाळी लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओम बिर्ला यांची अध्यक्षपदी निवड करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्याला काँग्रेससह सर्व प्रमुख पक्षांनी अनुमोदन दिले. हंगामी अध्यक्ष वीरेंद्र कुमार यांनी ओम बिर्ला यांची निवड झाल्याचे जाहीर केले. यानंतर पंतप्रधानांसह सर्वच पक्षांच्या गटनेत्यांनी ओम बिर्ला यांना अध्यक्षांच्या खूर्चीजवळ नेले आणि हस्तांदोलन करीत त्यांना अभिवादन केले
सुषमा स्वराज, सुमित्रा महाजन यांची संसदीय कारकीर्द समाप्त
ओम बिर्ला हे राजस्थानमधील कोटा-बुंदी लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार रामनारायण मीन यांचा अडीच लाख मतांनी पराभव केला होता. ओम बिर्ला हे सुमित्रा महाजन यांच्यानंतर १७ व्या लोकसभेचे अध्यक्ष झाले आहेत.
BJP MP from Kota, Om Birla elected as the Speaker of the 17th Lok Sabha. pic.twitter.com/Cuwe3zbRSA
— ANI (@ANI) June 19, 2019